Uncategorized

उमरखेडमध्येअतिक्रमणाच्या जागेवरून हाणामारी ! हाणामारीत घातक शस्त्रांचा समावेश !


तिघा जणाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !
= शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आला समोर =‍

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

घराशेजारी असणाऱ्या अतिक्रमणाच्या जागेवरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्याने हाणामारीची घटना दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता स्थानीक जामा मस्जिद वार्डात घडली असून तिघां जणाविरोधात उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादकिरकोळ असताना देखीलही या हाणामारीत खंजीर व तलवारी सारखे शस्त्रे निघाल्याने पुन्हा एकदा उमरखेड शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे दिसत आहे .

चार दिवसा अगोदर स्थानिक जामामस्जीद वार्डातील दोन शेजाऱ्याच्या घरासमोर असलेल्या सरकारी जागेवर आरोपी असणाऱ्यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार नमूद करून फिर्यादीने देखील त्या जागेवर खांबे रोवली होती त्याबद्दलचा वाद झाला होता . चार दिवसा अगोदर वाद झाला असतांना ती खांबे काल दिनांक २२ रोजी आरोपी अलिमुद्दीन अब्दुल रऊफ (३५)शेख मोबीन अब्दुल रऊफ (२४) नदीम अब्दुल रऊफ (३०)यांनी उघडून फेकल्याने वादाला सुरुवात झाली वाद होत असताना या तिन्ही आरोपींनी घातक शस्त्रांचा वापर केला खंजीर व तलवारी सारखे घातक शस्त्र घेऊन मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादी शेख आवेश शेख असद याने तक्रार दिल्यावरून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे .

चौकट :
उमरखेड शहरात मागील महिनाभरा पासून चोरीचे सत्र सुरू असून एकाही चोरीचा उलगडा आजपर्यंत झाला नाही . तसेच शहरातील या घटनेमुळे मात्र आता शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना असे प्रकरण शहरात होणे याला पोलिसांनी आळा घालून चोरट्यांना व दादागिरी करणाऱ्यांना गजाआड करावे अशी मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!