Uncategorized

महागाव तालुक्यात बालकामगारांचा सुळसुळाट; १९८६ व १९८८ च्या कायद्याचे सर्रास उल्लंघन


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ व 1988 कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तालुक्यातील वीट भट्ट्या तसेच हॉटेल व्यवसायात १४ वर्षांखालील लहान मुले काम करत असल्याचे अनेक ठिकाणी आढळून येत आहे. शिक्षणाच्या वयात ही मुले मजुरीसाठी राबताना दिसत असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
वीट भट्टी, हॉटेल व इतर असंघटित क्षेत्रात बालकामगार खुलेआम काम करत असल्याने यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. बालकांच्या शिक्षण, आरोग्य व भवितव्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे बालकामगार प्रतिबंधक विभाग, यवतमाळ यांच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यात नियमित तपासणी, दौरे अथवा ठोस कारवाई होत नसल्याचेही बोलले जात आहे. जिल्ह्यात बालकामगारविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्याने प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी बालकामगारांकडून काम करून घेणाऱ्या वीट भट्टी मालकांवर व हॉटेल चालकांवर तातडीने कारवाई करावी, तसेच अशा बालकांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, अशी जोरदार मागणी केली आहे. बालकामगारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button