गणपती विसर्जनाला काळाचा घाला!
पैनगंगा नदीत १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; चार-पाच जण पाण्यात पडले, एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
उमरखेड:-अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. तालुक्यातील मौजे बारा येथे पैनगंगा नदीपात्रात घरगुती गणपतीचे विसर्जन करत असताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या हरीश पुंडलिक हरणे (वय १७, रा. बारा, ता. उमरखेड) याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजता घड मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी हरीशसह चार-पाच तरुण पैनगंगा नदीपात्रात गेले होते. विसर्जनादरम्यान अचानक पाय घसरल्याने हे सर्वजण पाण्यात पडले. त्यावेळी सोबत असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत चार-पाच जणांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र हरीश हरणे पाण्याच्या प्रवाहात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. अखेर एनडीआरएफच्या पथकाने हरीशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेने बारा गावावर शोककळा पसरली असून, गणपती विसर्जनाचा आनंद काही क्षणांतच दुःखात बदलला.
विसर्जनस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गणेश विसर्जनाच्या काळात नदी, तलाव व जलाशयांच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी खोल पाणी, पाण्याचा प्रवाह आणि घसरण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पुरेशा सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे. बारा येथील घटनेनंतर विसर्जनस्थळी सुरक्षा व्यवस्था, बचाव पथकांची उपलब्धता आणि धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एका तरुणाचा जीव गेल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नदीपात्रातील विसर्जनस्थळी अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



