बबासाहेब नाईक सुतगिरणीच्या वाहनाचा अपघात!

महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे
बाबासाहेब नाईक सूतगिरणी आधीच चौकशी च्या फेऱ्यांमध्ये असताना भाडेतत्त्वावर देऊन सूतगिरणीचा कारभार रामभरोसे !अशा परिस्थितीमध्ये
महागाव तालुक्यातील पिंपळगाव (कान्हा) येथील बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीच्या गाडीचा नऊ दिवसापूर्वी मुडाणा शिवारात अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन शतीग्रस्त अवस्थेत आहे. सूतगिरणी आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईस आली असताना नाजूक परिस्थिती असतांना व्यवस्थापकीय संचालक आपल्या घरगुती कामासाठी गाडीचा वापर करीत असल्याचे परिसरातून जोरदार चर्चा आहे.
अपघातग्रस्त गाडी कोण चालवत होता. महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद कोणी दाखल केली. ड्रायव्हर कुठे आहे, याचा थांग पत्ता नाही. गाडीचा इन्शुरन्स आहे की नाही ? इतर माहिती उपलब्ध झाली नाही. अपघात ग्रस्त गाडीची नोंद महागाव पोलीस स्टेशनला झालेली आहे. पंचनामा करून इतर जो कार्यभाग केला, याची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. आधीच दिवाळखोरीत निघालेली सूतगिरणी दुसऱ्यांना कन्व्हर्शन मध्ये देण्यात आल्याचा नामुष्की संचालक मंडळावर ओढावली आहे. यामध्ये सूतगिरणीचे वाहन सूतगिरणीच्या कामासाठी वापरण्यात येत होते की ? संचालक मंडळाच्या खाजगी कामासाठी वापरण्यात येत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे.



