सामाजिक

राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी साहेबराव कांबळे

शेख मुजाहिद

सहसंपादक

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे (बेलखेडकर) यांची ‘राजीव गांधी पंचायत राज संघटन’ महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड झाली. या निवडीने काँग्रेस पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.साधा आणि सरळ असलेले दानशूर, गरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व, सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे, कर्तव्यदक्ष अधिकारी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे (बेलखेडकर) यांनी मुंबई येथून येवुन मागील एकवर्षापूर्वी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेवून ‘राजीव गांधी पंचायत राज संघटन’ महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड करण्यात आली. कमी वेळा मध्येच मतदार संघातील जनतेच्या आणि मतदारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांना कांबळे यांनी भेटी गाठी करून आपली लक्षणीय ओळख विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण केली आहे. पण या अगोदरआमदारकीच्या उमेदवारीसाठी कोणत्याही नेत्याने एवढी धडपड केली नाही विधानसभा क्षेत्रामध्ये होणाऱ्या हालचाली समस्यांपर्यंत किंवा मतदाराच्या ते पोहोचू शकले नाहीत. पण कांबळे यांनी स्वतःला जनतेचा सेवक म्हणून काम करण्याची इच्छा मनात ठेऊन कार्य करण्याला सुरुवात केली. त्यामुळे उमरखेड व महागाव तालुक्यात कांबळे यांचीच चर्चा जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!