Uncategorized

विद्यार्थिनींनी सजग राहिले पाहिजे

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
( मार्गदर्शक करताना पोलीस सहाय्यक निरीक्षक सरस्वती राठोड)
स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय महागाव येथे विद्यार्थी सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन करताना पोलीस सहाय्यक निरीक्षक सरस्वती राठोड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी सजग राहिली पाहिजे. कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नाही पाहिजे ती स्पष्टपणे शिक्षिका किंवा आई यांना सांगितली पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा मेश्राम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस कर्मचारी जयश्री राठोड शिक्षिका दीपिका, देसाई वर्षा ब्रह्मटके, भारती पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे त्या म्हणाल्या की कुटुंबात राहताना व प्रवासात फिरताना गुड टच व बॅड टच याची जाणीव विद्यार्थिनींना असली पाहिजे संकट समई 112 या नंबर वर त्वरित कॉल करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा विद्यार्थिनींना देऊन वेळप्रसंगी मला स्वतः कॉल करा असे सांगितले. यावेळी जयश्री राठोड यांनी तुम्हाला अडचण असली तर मला कॉल करा मी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमची अडचण ऐकून घेईल व त्या अडचणीवर उपाययोजना करून तुमचे कुठेही नाव येवु देणार नाही. तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य मेश्राम यांनी आमच्या विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी ह्या बाहेरगावावरुन येजा करतात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मानव विकास व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बसणे प्रवास करतात. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला बस स्थानकावर सुरक्षिततेसाठी सहाय्य करावे असे आवाहन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव धात्रक तर आभार श्रीकांत कदम यांनी मांनले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button