बाळदी येथील जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पॅड भेट

(प्रहार शाखा बाळदी यांचा सामाजिक उपक्रम)
सिध्दार्थ दिवेकर ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि.२७ जानेवारी) आजच्या दिवशी भारतात जगातील सर्वात मोठी लिखित अशी राज्यघटना लागू झाली.
त्या दिवसा पासून संपूर्ण भारतात २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
त्याच पार्श्वभूमीवर उमरखेड तालुक्यातील बाळदी जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा बाळदी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पॅड भेट वस्तू देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे बाळदी शाखा प्रमुख प्रविण इंगळे यांनी भेट देऊन प्रजासत्ताकदिनी हा सामाजिक उपक्रम राबविला.
यावेळी जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मुक्कावार सर,शिक्षक रुंद ,ग्रामपंचायत च्या माजी सरपंच साहेबराव मिराशे, ग्राम पं सदस्य, बेबाताई दत्ता राठोड सुरेश वटाणे, नंदु टिपरे , अतिश वटाणे, शाळा समितीचे सर्व सदस्य (नेवी सोलजर) सुरज कदम , नितीन राठोड, प्रफुल वानखेडे, जयेंद्र धुळे , बंडू ठाकरे , अविनाश दुधे , संतोष हरण , राज कुमार भगत यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.