पत्रकार इरफान शेख यांच्या हा मरण उपोषणाला भिम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा…!

(उपोषणकर्त्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार)
सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड (दि. २३ जुलै)
उमरखेड वार्ताचे मुख्य संपादक शेख इरफान यांच्यावर प्राणघाती हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हा दाखल न झाल्यामुळे दि. १० जुलै रोजी पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. व त्यांच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत
हल्लेखोरांवर कलम ३०७,११०, पत्रकार सुरक्षा कायदा आणि एमपीडीए कायदया अंतर्गत कारवाई करण्यात यावी,
या गुन्हयातील गुन्हेगारांना जलील कुरेशी आणि शाहरूख पठाण यांच्याकडुन चिथावणी देवुन प्रोत्साहीत करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी यांचेवर सुध्दा कार्यवाही करावी. व तसेच गुन्हेगारांना अभय देणारे ठाणेदार संजय सोळंखे व ए पी आय सरदार यांची तात्काळ बदली करावी.
इत्यादी मागणीसाठी उपोषणकर्ते शेख इरफान यांना सामाजिक संघटना भिम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा देऊन
वेळीच ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांचे नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
असे लेखी निवेदन उमरखेड ठाणेदार यांना देण्यात आले यावेळी शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ, करण दादा भरणे उपजिल्हा प्रमुख यवतमाळ, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर उमरखेड यांनी आमरण उपोषण मंडपी भेट देऊन तसेच पोलीस स्टेशन येथे जाहीर पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले.