महागाव वनविभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड
₹५ हजारांची लाच स्वीकारताना तिघांवर कारवाई; यवतमाळ एसीबी पथकाची कारवाई

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव येथील वनविभाग कार्यालयात यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत ₹५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तिघांवर कारवाई केली. या कारवाईमुळे वनविभागाच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुदाम देवसिंग जाधव, रा. दगडधर यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान आनंद बोरेकर (वनपाल), विनोद सोलंके (ऑपरेटर) आणि जयवंत ढगे (वनमजूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर यवतमाळ येथील एसीबी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ₹५ हजारांची लाच स्वीकारण्याच्या कारवाईदरम्यान संबंधितांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, लाचेची मागणी नेमकी कोणत्या कामासाठी करण्यात आली होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
यवतमाळ एसीबी पथकाच्या या कारवाईमुळे महागाव परिसरात चर्चेला उधाण आले असून, वनविभागातील कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



