घराची भिंत पडल्याने लाखोंचे नुकसान: हिवरा संगम येथील घटना!

(सुदैवाने जीवित हानी टळली मात्र कुटुंब आले उघड्यावर).
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात अतिवृष्टी व महापुराच्या तडाख्यात खरीप हंगामातील पिके उध्वस्त होऊन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यावर अस्मानी संकट ओढवले अशा दयनीय परिस्थितीत गुजरान करत असतानाच गुरुवार दि २८ ऑगस्ट पासून सतत पडणाऱ्या अतिवृष्टी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शुक्रवारी पहाटे दरम्यान तालुक्यातील हिवरा संगम येथील वार्ड क्र.३ मध्ये राहणारे अल्पभूधारक शेतकरी तथा हिवरा संगम ग्रामपंचायतचे माजी सदस्य हिदायतुलाखान आताहऊल्ला खान यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले तर उर्वरित भिंतीला तडे गेले आहेत त्यांचा स्वयंपाक खोलीतील पूर्ण संसार उपयोगी साहित्ययामध्ये

दबून गेले तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले देव बलवत्तर म्हणून गोठ्याच्या बाहेर बांधलेले दोन जनावरे सुदैवाने बचावली आहे आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामना करत असलेले अल्पभूधारक शेतकरी हिदायतुला खान यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच हिवरा ग्राम महसूल अधिकारी जीवन जाधव,ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ धोतरकर यांनी घटनास्थळावर जाऊन भेट दिली तात्काळ शासनाने नुकसान भरपाई ची मदत करावी अशी मागणी होत आहे



