सामाजिक

उमरखेड ते यवतमाळ अवैधरित्या सुरू असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स तात्काळ बंद करा – शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष)

[उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे लेखी तक्रार दाखल]

सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड तालुका प्रतिनिधी)

उमरखेड (दि. १८ जुलै) उमरखेड ते यवतमाळ या मार्गावर अवैधरित्या सुरू असलेल्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स तात्काळ बंद करण्यात यावे.
अशी लेखी तक्रार निवेदनामार्फत दाखल केली आहे.

कारण यामुळे निम्म शासकीय एसटी बसेसला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असतांना दिसत आहे व शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.

तसेच अवैध खाजगी ट्रॅव्हल्स मधील कंडक्टर प्रवाशांना अरे-रावीची भाषा करून मनमानी तिकीट दर आकारून अवैध वसुली करीत आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये ठरलेल्या सीट्स पेक्षाही जास्त प्रवासी कोंबून प्रवाशांच्या जीवाशी हे खाजगी ट्रॅव्हल्स वाले खेळत असताना दिसून येत आहे तसेच अपघात कालीन या ट्रॅव्हल्स मध्ये मेडिकल किट आणि फायर सिलेंडर सुद्धा उपलब्ध नाहीत.

तरी साहेबांनी उमरखेड ते यवतमाळ अवैधरीत्या सुरू असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स तात्काळ बंद करून प्रवाशांची होणारी जीवित हानी टाळावी. असे लेखी तक्रार निवेदन देण्यात आले.

अन्यथा आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास भिम टायगर सेना उमरखेड यांच्यातर्फे आमरण उपोषण करण्यात येईल. यात जीवितहानी झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!