सुरेश नरवाडे नगरसेवक महागाव यांनी नगरपंचायत चे काळे कारनामे केले उघड!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मध्ये विविध योजनेअंतर्गत केलेल्या कामाची माहिती दी. 15-4-2025 रोजी सुरेश नरवाडे नगरसेवक यांनी मागितली असता त्यामध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले. मुख्य अधिकारी नगरपंचायत यांनी दिनांक-3-5-2024 रोजी कार्यालयीन पत्र 1) श्रीमती रोशनी नाईक, स्थापत्य अभियंता 2) मनोज कुडमिथे कर निर्धार प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत यांना आपल्या विभागातून विविध कामाच्या करण्यात आलेल्या कामाची माहिती उपलब्ध करून देणे असे आदेश केले होते. त्यामध्ये पुढील कामे

क्र,1)नागरी सुविधा योजनेअंतर्गत विविध प्रभागातील रस्ते व नाली बांधकाम 2) प्रोत्साहन अनुदान अंतर्गत विविध प्रभागातील सार्वजनिक शौचालय व बांधकाम क्रमांक 3) 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध प्रभागात विंधन विहीर तयार करणे क्रमांक 4) सन 2024- 25 करिता प्रशासन विभागांतर्गत विविध कामाच्या वार्षिक निविदा प्रक्रिया अशा संपूर्ण कामाची माहिती मागितली असता कामाच्या नस्तीची तपासणी केली असता सदर नस्तीवर आपली व तात्कालीन विभाग प्रमुखाच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित नगर सेवकांना सदरची माहिती पुरविण्यात आली नाही. त्यामुळे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला का ? सदर नस्तीतील अपुरे कामकाज पूर्ण करून स्वाक्षरीसह नस्ती सादर करावी जेणेकरून संबंधित तास माहिती उपलब्ध करून देता येईल असे आदेश करण्यात आले. परंतु आज पर्यंत उपलब्ध करून न दिल्यामुळे कामांमध्ये अनियमितता झाल्यामुळे माजी उपाध्यक्ष सुरेश नरवाडे यांनी नगरपंचायत कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे .हे संपूर्ण काम पारदर्शक झाले असते तर नगरसेवकाला माहिती उपलब्ध झाली असती असे त्यांनी मत आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले त्यामुळे संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक माजी उपाध्यक्ष सुरेश नरवाडे यांनी केली आहे



