Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

लाल झेंड्याखाली महागावात हजारोंचा एल्गार
दुष्काळाच्या मागणीसाठी किसान सभेचा तहसीलवर धडक मोर्चा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : हातात लाल झेंडे, गगनभेदी घोषणांचा आवाज आणि वाद्यांच्या गजरात महागाव तालुक्यात मंगळवारी किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावर्षीच्या भीषण कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला आणि नवतरुण या मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे महागाव शहरातील रस्त्यांवर जणू जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून मोर्चाला उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध रस्ते आणि मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
यावेळी विविध महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत सुमारे दहा वक्त्यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर जोरदार भूमिका मांडली.
‘ट्रिगर-२’मध्ये महागावचा समावेश करा
यावर्षीच्या पावसाच्या कमतरतेमुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. महागाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त क्षेत्राच्या ‘ट्रिगर-२’मध्ये समावेश करावा, अशी किसान सभेची प्रमुख मागणी आहे.
आंदोलकांच्या मते, ‘ट्रिगर-१’ हा कमी पावसाची किंवा दुष्काळसदृश परिस्थिती दर्शविणारा टप्पा आहे. ‘ट्रिगर-२’मध्ये वनस्पतींची स्थिती दर्शविणारी उपग्रह छायाचित्रे, जमिनीतील आर्द्रता आणि प्रत्यक्ष पीक उत्पन्न यांसारख्या निकषांचा विचार केला जातो. या निकषांच्या आधारे महागाव तालुक्याची वस्तुस्थिती तपासून दुष्काळी सवलती व मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदारांकडून ३० सप्टेंबरला खातेप्रमुखांची बैठक
मोर्चानंतर स्थानिक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तहसीलदारांनी ३० सप्टेंबर रोजी संबंधित विभागांच्या खातेप्रमुखांची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पीक कर्जदरपत्रकानुसार कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच वंचित महिलांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचेही सांगण्यात आले.
वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेलाही किसान सभेने विरोध दर्शविला असून, जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामीण भागातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड डी. बी. नाईक आणि देवीदास मोहकर यांच्यासह किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक सहभागी झाल्याने महागाव तालुक्यातील शेतकरी प्रश्नांनी पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button