Uncategorized

उमरखेड ते शिर्डी साई पायदळ दिंडीचे भव्य प्रस्थान

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड ;- साई भक्तांच्या अपार श्रद्धेचा प्रत्यय देणारी आणि भक्तिभावाने भारलेली उमरखेड ते शिर्डी पायदळ पदयात्रा गेल्या १२ वर्षापासून साईबाबांच्या चरणी चालू असून आज बुधवार, दि. ०२ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता श्री साई मंदिर, फॅक्टरी वाई, उमरखेड येथून मोठ्या उत्साहात व मंगल वातावरणात प्रस्थान झाली.

या पवित्र पदयात्रेचे आयोजन साई सेवा समिती उमरखेड यांच्यावतीने करण्यात आले असून,श्री क्षेत्र औदुंबरनगरी मार्गे सुमारे ४५० किमीचे अंतर पार करून साईबाबांच्या शिर्डी मंदिरात भक्तगण दर्शन घेणार आहेत. यात्रेच्या मार्गावर दररोज विश्रांती व पूजनाचे कार्यक्रम होणार असून भक्तांना अध्यात्मिक अनुभूती मिळवून देणे हा प्रमुख हेतू आहे.

या वर्षी यात्रेमध्ये शेकडो साई भक्त सहभागी झाले आहेत. यासाठी १०१ रुपये नाममात्र नोंदणी शुल्क घेण्यात आले असून, यात्रेच्या प्रत्येक टप्प्याची आखणी अत्यंत सुयोग्य प्रकारे करण्यात आली आहे.साई बाबा पदयात्रेत भाविक भक्ताचा समावेश.

यात्रा सुरू होण्याच्या आधी श्री साई मंदिरात साईबाबांची महाआरती, अभिषेक आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. यात्रेच्या मार्गस्थतेवेळी ढोल-ताशे, लेझीम पथक, भगव्या पताका आणि साई नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या पवित्र यात्रेदरम्यान सहभागी साईभक्तांसाठी भोजन, निवास, वैद्यकीय तपासणी आणि अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था आयोजक मंडळाकडून करण्यात आली आहे.

साई नामाचा गजर, भक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या भावना आणि भक्तिपथावर चालणारे शेकडो चरण – यामुळे ही यात्रा फक्त चालण्याची नाही तर श्रद्धेचा व संयमाचा एक महापर्व ठरणार आहे .या पायदळ दिंडी मध्ये सहभागी झालेले सुनिल मुडे, मनोहर वानखेडे, तानाजी शिंदे, अशोक वानखेडे, कृष्णा वानखेडे, गजानन यशंवकर, प्रकाश भोकर, कैलाश जाधव पांडुरंग पराते, शामसुंदर मरडकर बबनराव शिवडकर, संदिप पारवेकर, ज्ञानेश्वर काळपांडे अनेक साईभक्तानी सहभाग नोदंविला.

“श्री साईनाथ महाराज की जय!”
“जय साईराम!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button