शैक्षणिक

विद्यार्थीनीच्या सुरक्षेसाठीसखी सावित्री समितीच्या माध्यमातुन उपाययोजना न केल्यास शाळांवर कठोर कारवाई करणार..

शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत .

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : शासनाने आदेशित केल्याप्रमाणे यवतमाळ जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत मॅडम यांच्या आदेशाने तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा जिल्हा परिषद मुलींची शाळा उमरखेड येथे संपन्न झाली. या सभेत प्रत्येक शाळांत सखी सावित्री समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या व समितीला प्रत्यक्ष कृतीत न आनणाऱ्या विद्यालयावर कठोर कार्यवाही करायची तंबी दिली.
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2022/प्र क्र 39/ एस डी -4 दि. 10.3.2022 नुसार आदेश दिलेले आहेत.

डॉ जयश्री राऊत मॅडम माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी जिल्हा परिषद मुलींची शाळा उमरखेड येथे सभा आयोजित करून उपस्थित शिक्षक वृंदांना व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिलेला आहे.

राज्यभरात घडत असलेल्या मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भात मॅडमनी सदर उदगार काढले.
या दरम्यान त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड, गावंडे कॉलेज उमरखेड येथे मुलाखत चालू असताना भेटी दिल्या.


जिल्हा परिषद मुलींची शाळा उमरखेड येथे सभेदरम्यान विचार मंचावर शेंडगे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कांबळे साहेब, मुख्याध्यापक प्रमोद देशमुख,उपस्थित होते.या कार्यक्रमाला उमरखेड तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व विद्यालयात सखी सावित्री समिती व इतर सर्व समित्या स्थापन करणे काळाची गरज आहे व दर्शनी भागावर व समितीचे फलक लावणे आवश्यक आणि बंधनकारक आहे असे सांगितले .

शासन परिपत्रकानुसार महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात देखील सर्व समित्याचं गठण करण्यात आले. सर्व समित्यांचा अहवाल शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!