दुधागिरी महाराज पालखी व यात्रा महोत्सव साजरा

उमरखेड :- तालुक्यातील धनज येथे दुधागीरी महाराज यांची पालखी व भव्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.दरवर्षी पोळ्याच्या कारीला यात्रेची सुरवात यात्रा भरते यात यवतमाळ जिल्हयातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
श्रावण महिना लागला की दुधागिरी महाराज यांच्या मंदिरात दररोज भजन,कीर्तन, असे धार्मिक कार्यक्रम होतात. या भजनाच्या कार्यक्रमात आडद,धनज, माळआसोली
पिंपळदरी,वानेगाव,मोहदरी, मुळावा,या गावातील भजनी मंडळ उत्साहाने सहभागी होऊन भजन कीर्तन म्हणतात.पोळ्याच्या करीच्या दिवशी सकाळी गावात गावभर दुधागिरी महाराज यांची पालखी काढल्या जाते पल किसून पूर्ण गावामध्ये प्रतीक्षा प्रदक्षिणा घेतात सर्व गावातील भाविक भक्त पालखीचे दर्शन घेतात दुधागिरी महाराजांच्या जयभूषण पूर्ण गाव आनंदाचे वातावरण
पालखी सोहळा मंदिरा जवळ आल्यावर मंदिरावर ह भ प मारोतराव महाराज रिठे यांचे काल्याचे किर्तन झाले व कीर्तन झाल्यानंतर सर्व भक्त मंडळींनी व गावकरी मंडळी महाप्रसादांचा लाभ घेतात यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद दिल्या जातो.दरवर्षी दहा ते पंधरा हजाराच्या वर भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतात.या महाप्रसादासाठी धनज येथील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन या महाप्रसादाचे नियोजन करतात.धनज येथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असून सुद्धा या यात्रे मध्ये महाप्रसादा मध्ये अतिशय एकोप्याने राहून हा सोहळा आनंदात संपन्न करतात.



