Uncategorized

पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील मौजे लोनवाडी फाटा येथून गावठी बनावटीचा देशी कटटा वाळगणा-या इसमांस ताब्यात घेवून त्याचेकडून गावठी बनावठीचा देशी कटटा व मोटार सायकलसह

1,02,000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

दिनांक 06/11/2024 रोजो स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की. इसम नामे मारोती नागोराव चिरंगे हा त्याचे ताब्यातील पल्सर मोटार सायकल मध्ये गावठी बनावटीचा देशी कटटा बाळगून असून तो मौजे लोनवाडी फाटा येथे त्याचे पल्सर मोटार सायकलसह थांबला आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेवुन पथकाने तात्काळ लोनवाडी फाटा येथे रवाना होवुन संशयीताचा शोध घेत असतांना सदर ठिकाणी एक काळया रंगाच्या पल्सर मोटार सायकलसह एक इसम दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मारोती नागोराव चिरंगे वय 32 वर्ष, मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले त्याचे ताब्यातील पल्सर मोटार सायकलचो सिटची पाहणी केली असता त्यामध्ये गावठी बनावटीचा देशो कटटा मिळून आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेतला. त्यानंतर सदरचा देशी कटटा कोणाचा आहे व कोणाकडून घेतला याबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदरचा देशी कटटा त्याचे मित्राने। ते 2 महीन्यापुर्वी त्याचेकडे ठेवण्यासाठी दिला होता देशी बनावठीचा कटटा बाळगणारा मारोती नागोराव चिरंगे वय 34 वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता.पुसद

नि. यवतमाळ यांच्या ताब्यातून एक देशी कटटा किं. 30,000 रु. 2 राउड (काडतुस) किमत 2000 रु एक पल्सर मोटार

सायकल कमांक MH-29-T-8069 असा एकूण 1,02,000 रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला असून आरोपो नामे मारोती नागोराव चिरंगे वय 34 वर्ष, रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ व त्याचा साथीदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 35 अन्वये गुन्हा नोदीसह कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिता सो, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सी., तसेच मा सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.हषर्वधन बी.जे सो., श्री. ज्ञानोबा देवकाते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहया कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!