गणेश विसर्जन मार्गाची ठाणेदार वानखडे यांच्याकडून पाहणी
विसर्जनापूर्वी रस्ते, खड्डे व विद्युत तारांची तपासणी; संबंधित विभागांना खबरदारीच्या सूचना

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखडे यांनी विशेष नियोजन करत कॅन्डल मार्चसह संपूर्ण विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी रस्त्यांची स्थिती, रस्त्यावरील खड्डे तसेच विद्युत तारांची पाहणी करून संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
गणेश विसर्जन दिनांक २५ सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्यापूर्वी विसर्जन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून डागडुजी करण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत तारांमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशमूर्तीला कोणत्याही प्रकारची विटंबना अथवा अनुचित घटना घडल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही अधिकृत पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विसर्जन मार्गावरील अडथळे, रस्त्यांची दुरवस्था आणि विद्युत व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यावर पोलिस प्रशासनाने भर दिला आहे.
ठाणेदार वानखडे व त्यांचे सहकारी अंबोरे एपीआय पोलीस स्टॉप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या पाहणीमुळे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



