सामाजिक

भाजपा प्रदेशाध्यक्षानां दाखाविले मराठा आंदोलकांनी काळे झेंन्डे


१० मराठा आंदोलकांनां केले स्थानबद्ध

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात संपर्क दौऱ्या म्हणून राजस्थानी भवन येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे उमरखेड येथे बैठकीला आले असता त्यांना सकल मराठा समाजाच्या आंदोलक आणि कार्यकर्त्यानी मराठा आरक्षण न मिळाल्या बद्दल निषेध म्हणून काळे झेंन्डे दाखवुन ” एक मराठा लाख मराठा ” आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ” अशा घोषणा देऊन राज्य सरकारबद्दल रोष व्यक्त केला
या वेळी पोलिसांनी मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करून पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले
यावेळी सचिन घाडगे ,सरोज देशमुख ,प्रमोद देशमुख ,गजानन देशमुख भांबरखेडे ,नितीन शिंदे, गोपाल झाडे, वर्षा देवसरकर, बळीराम मुटकुळे ,गजेंद्र ठाकरे यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन सोडण्यात आले
हिंगोली लोकसभा अंतर्गत उमरखेड, हदगांव, किनवट विधानसभा मतदार संघातील १०० वॉरीयर्स च्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे आले होते त्यावेळी त्यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला समोर जावे लागले यावेळी आंदोलकावर भादवी १३५ मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

चौकट ! जोपर्यन्त सकल मराठा समाजाला सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणार नाही तोपर्यन्त कोणत्याच राजकीय पक्षाची सभा आणि कार्यक्रम होऊ देणार नाही
सचिन घाडगे
उपोषणकर्त


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!