बाळदी तांडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दहन शेड बांधकाम त्वरित चालू करा….

(अन्यथा पंचायत समिती समोर उपोषणाला बसू)
(प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना उपोषणाचा इशारा )
शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील बाळदी गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत दहन शेड नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दिनांक 21/ 04/2023 ला निवेदन उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले होते.
या निवेदनावर गटविकास अधिकारी उमरखेड यांनी वार्षिक उत्पन्नातून करून घ्या असा आदेश पारित केला होता. परंतु तो आदेश पाळण्यास ग्रामपंचायतीला व पंचायत समितीला तब्बल दोन वर्षे लागले. त्यानंतर नुकतेच बाळदी गावात दिनांक 28/ 6 /2025 रोजी प्रेताला उघड्यावर अग्नी देण्यात आली.
व त्या या घटनेने पडसाद प्रसारमाध्यमातून होऊन त्या विषयावर अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीकडून स्मशानभूमीसाठी जागा पाहणी करून मोजमाप करण्यात आले. परंतु तिथे अद्याप दहन शेड व इतर स्मशानभूमी विकासात्मक कामे सुरू न झाल्यामुळे सदरचे कामे त्वरित चालू करावी . अन्यथा कामे 15 दिवसाच्या आत सुरू न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव उपोषणाला बसावे लागेल. असा इशारा प्रहारचे सर्कल प्रमुख व तालुका सदस्य प्रवीण इंगळे यांनी दिला यावेळी निवेदन देताना प्रफुल वानखेडे, संतोष हरण , नितीन राठोड, खंडू भोंग आदी उपस्थित होते



