Uncategorized

साहेबराव कांबळेंनी हिवाळी अधिवेशनात काँग्रेस गटनेत्यांकडे मांडल्या विधानसभा मतदार संघातील समस्या !

( जनतेशी नाळ न तोडता संघर्ष सुरुच ; साहेबराव कांबळे पुन्हा चर्चेत )

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड :नागपूर हिवाळी अधिवेशनात उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघातील ज्वलंत समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी विधानसभेतील काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे समस्यांचे निवेदन शासनापर्यन्त पोहचविण्यासाठी साकडे घातले आहे .
मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला असला, तरी मतदारसंघाशी नाळ तुटू न देता नागरिकांच्या प्रश्नांसाठी, त्यांनी हिवाळी अधिवेशन काळात पूर्ण वेळ उपस्थित राहून आपल्या पक्षाच्या गटनेत्यांमार्फत मतदार संघातील अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करून याबाबत विधानसभा अध्यक्षांपर्यन्त मतदार संघातील समस्या मांडण्याची गळ घातली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी म्हटले आहे .
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजना तसेच गोठा अनुदानाचे हप्ते मागील अनेक महिन्यांपासून रखडले असून, त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी व्याजाने पैसे काढून घरकाम अर्धवट अवस्थेत ठेवले असल्याचे वास्तव त्यांनी शासनापर्यंत पोहोचविले. याशिवाय डिजिटल इंडिया, आयुष्यमान भारत, पीएम विश्वकर्मा, लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, आपले सरकार आदी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटरचे मानधन मागील सहा महिन्यांपासून थकीत असल्याने त्यांनाही तातडीने दिलासा देण्याची मागणी त्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांच्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचविल्या आहेत.
याशिवाय मतदारसंघातील जीर्ण रस्ते, शेतकऱ्यांवरील सहस्त्रकुंड प्रकल्पाचे घोंघावते संकट, वीज समस्या, इसापूर धरणाच्या पाण्याचे नियोजन, बंदी भागातील रस्ते व मूलभूत सुविधांचा प्रश्न अशा अनेक विषयांवर साहेबराव कांबळे यांनी नागरिकांचा आवाज अधिवेशनात काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील ज्वलंत सोडविण्याच्या दृष्टीने आपण सदैव प्रयत्नशिल राहणार असल्याचे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे म्हटले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button