धारेगाव शिवारात सहा जुवाऱ्यांनवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही!

महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक जुगार मटक्याचे काउंटर,
महागाव पोलीस अनभिज्ञ कसे?
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक बीट मधून अवैध धंद्याने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारेगाव शेत शिवारात धाड टाकीत सहा जुवाऱ्यांनवर कार्यवाही केली. स्थानिक गुन्हे शाखा पुसद पथक महागाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येऊन धाड टाकतात. परंतु महागाव पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही कशा याची जनतेला नवल वाटते आहे.
मागील अनेक दिवसापासून महागाव पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये हवेत अवैध धंद्याने प्रचंड डोके वर काढले आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच बीटमध्ये महागाव पोलिसांच्या आशीर्वादाने मटका क्लब सह गुटखा, गावठी दारू, बनावट देशी दारू विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाला पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याबाबत इत्यंभूच माहिती होते. आणि महागाव पोलीस स्टेशन यंत्रणेला याबाबत काहीच थांगपत्ता लागत नाही. याबाबत सामान्य जनतेचा कुतूहल होत आहे. घारेगाव हद्दीमध्ये जत्रा साखरे यांच्या शेतामधील टिन शेडमध्ये अनेक जुवारी एका बादशाह हा 22 पाणी जुगार खेळताना मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने झाड टाकत सहा आरोपींना अटक करून 2,67,720 एवढा मुद्देमाल जप्त केला. कार्यवाही झालेल्या जुवाऱ्यामध्ये मुडाना येथील अविनाश घुमणर, राहुल वानखेडे, देवानंद दांडे, बंडू लोखंडे आणि धारमोहा येथील विनोद चव्हाण, भिकाजी पाटमोरे अशा सहा जणांचा समावेश आहे. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच बीट मधून अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. अंबोडा येथे मागील अनेक दिवसापासून महागावातील पांढरपेशा तरुणांचा महागाव पोलिसांच्या हप्तेखाऊ धोरणामुळे प्रचंड जुगार खेळ चालू असल्याचे कळते. महागाव शहरांमध्ये एक अधिकृत देशी विक्रीचा परवाना आहे. परंतु शहरांमध्ये अवैध रित्या बनावट देशी दारूचे शंभरच्या जवळ पास चिल्लर विक्रीचे दुकान उपलब्ध आहेत. महागाव पोलीस निरीक्षक आणि संपूर्ण बीट जमादार यांना ह्या बाबींचा थांबपता लागत कसा नाही? पाणी कुठे मुरते आहे. पोलीस अधीक्षकांनी महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे पाळेमुळे शोधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी लक्ष देण्याची सामान्य जनतेतून विचार व्यक्त होत आहेत. धारेगाव शेत शिवारातील दत्तराव साखरे यांच्या शेतातील 52 पाणी जुगाराबाबत रमेश राठोड पोलीस कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून अपराध क्र. 363/ 2025 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हे नोंद झाला आहे. कैलास नेवकर आणि सुनील चेके हेड कॉन्स्टेबल पुढील तपास करीत आहे.



