Uncategorized

अनंतवाडी ग्रामपंचायतीतील जलजीवन मिशनमध्ये अनियमितता उघड; लाखो रुपयांची वसुलीचा आदेश


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील अंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अप्पर आयुक्त, अमरावती सुरज वाघमारे यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
चौकशीत उघड झालेल्या अनियमिततेनुसार संबंधित कामांवर झालेल्या खर्चापैकी १७,३८,३६० रुपये तसेच जेसीबी कामावर खर्च केलेल्या ४,००,००० रुपयांसह इतर रकमा वसुली पात्र ठरवण्यात आल्या आहेत.
यासोबतच उपअभियंता सौरभ सोनी यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्याकडूनही १,१९,१८७ रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामसेवक यांच्याकडूनही संबंधित रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात संबंधित सरपंचांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अंतर्गत सरपंच कव्हाणे यांना अपात्र ची कारवाई करून अपात्र घोषित करण्यात आले आहे.
निविदा प्रक्रिया डावलली, कागदपत्रांमध्ये त्रुटी
चौकशी अहवालात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या कामांसाठी आवश्यक असलेली ई-टेंडर प्रक्रिया पूर्णपणे टाळण्यात आली. शासन नियमांनुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त खर्चाच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया बंधनकारक असतानाही थेट खरेदी करण्यात आल्याचे आढळले.
तसेच,
कामांच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांचा अभाव
ठेकेदारांची नोंद अपूर्ण
मोजमाप पुस्तिकेमध्ये गंभीर त्रुटी
कामगारांची नावे नोंदविल्याशिवाय देयके अदा
अशा अनेक बाबी चौकशीत उघड झाल्या आहेत.
ग्रामस्थांमध्ये संताप; कठोर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकारामुळे अंतवाडी गावात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी “घरोघरी नळ” योजना महागाव तालुक्यात अनेक ठिकाणी अपयशी ठरत पाण्याच्या टाक्या पडल्या काही टाक्या पडण्याच्या अवस्थेतअसल्याचे चित्र या प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button