भारतीय जनता पार्टीच्या उमरखेड शहराध्यक्ष पदी अतुल खंदारे यांची निवड.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
भाजपा संघटन पर्व या अंतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या मंडळ अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती काल करण्यात आली. पक्षाच्या आदेशानुसार पक्षासाठी समर्पित आणि तरुण अशा चेहऱ्यांना संधी देण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांन कडून होते. त्यानुसार उमरखेड शहरामध्ये पर्यवेक्षकाच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांची मत जाणून घेऊन एक मताने अतुल रमेश खंदारे यांची उमरखेड भाजपा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अतुल खंदारे हे अनेक वर्षापासून पक्षाचे काम करत असून शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या नियुक्तीमुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्व निवडणुकांमध्ये फायदा होईल हे मात्र नक्की.



