Uncategorized
नगरपंचायत नगरसेवक आपल्या वार्डामध्ये रस्ता करतील का ?

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातून काही प्रभागात विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चिखलातून मार्गक्रम करावे लागत आहे. नगरपंचायत नगरसेवक व प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधणार आहे काय ? त्यामुळे या वार्डातील नागरिकांनी येणाऱ्या नगरपंचायत मध्ये चांगला नगरसेवक निवडून आणू व आपल्या वार्डाचा विकास करू अशी चर्चा सुरू केली आहे. पैसे घेऊन मतदान केल्यावर नगरसेवक अशी परिस्थिती आपल्या वार्डात करतो हे यावेळी दिसून आले. त्यामुळे नागरिकांना जागृत होण्याची वेळ आली आहे.



