Uncategorized

महागाव तालुक्यात पेढी येथे 33 केव्ही सब स्टेशनच्या वॉल कंपाऊंड कामात निकृष्ट दर्जा; ठेकेदार–अधिकारी संगनमताचा आरोप



महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुका (पेढी) — येथील मंजूर झालेल्या 33 केव्ही सब स्टेशनच्या वॉल कंपाऊंड बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पेढी येथे सध्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू असून, ठेकेदाराने नाल्याची वाळू, कमी प्रमाणात सिमेंट, तसेच पुरेसा पाणीपुरवठा न करता काम चालवल्यामुळे बांधकामाची भिंत अक्षरशः गोट्यांसकट निघून पडल्याचे उघड झाले आहे. काम सुरू असताना नियमित पाणी न मारल्याने भिंतींना आवश्यक मजबुती न मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले.

स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण असून, मोठा निधी प्राप्त असूनही ठेकेदार मालामाल होण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्ते राठोड यांनी सांगितले की, “कामाचे योग्य कॉलिटी कंट्रोल न करता वॉल कंपाऊंड थातूरमातूर उभे करून प्लास्टर करून लपवण्याची तयारी सुरू आहे. हे सरळ सरळ अधिकारी–ठेकेदार संगनमताचे उदाहरण आहे.”

नागरिकांनी मागणी केली आहे की:

कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी

निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवून योग्य प्रमाणात दुरुस्ती व नवे काम करण्यात यावे

अधिकाऱ्यांनी संगनमत न करता गुणवत्ता तपासणी कठोरपणे करावी

स्थानिक नागरिक आणि राठोड यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या अनियमिततेबाबत विभागीय कार्यालयांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button