टेंभुरदरा प्रकरणातील आरोपीला ३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी अवैध सागवान चिराण माल जप्त; वनविभागाच्या कारवाईने लाकूड तस्करांमध्ये खळबळ

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव वनपरिक्षेत्रातील सेनंद बीटअंतर्गत टेंभुरदरा येथे सागवान वृक्षांची अवैध तोड करून चिराण मालाचा साठा केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताच्या घराची झडती घेतली असता सागवान जातीचा चिराण माल आढळून आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी परसराम बबन टारपे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
वनविभाग कार्यालय महागावचे अधिकारी राज ओवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अवैध सागवान चिराण माल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपी परसराम टारपे याला ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. यापूर्वी वनकोठडीसंदर्भात झालेल्या कार्यवाहीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया करण्यात आली.
पट्ट्याच्या नावाखाली अवैध लाकूड वापरल्याचा संशय
महागाव तालुक्यात काही ठिकाणी पट्ट्याच्या नावाखाली शेतातील लाकूड आणणे, त्यात जंगलातून आणलेल्या लाकडाची सरमिसळ करणे आणि त्याचे चिराण करून फर्निचर तयार करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी व आरोप यापूर्वीही चर्चेत आले आहेत. सागवान लाकडापासून दरवाजे, खिडक्या तसेच विविध प्रकारचे फर्निचर तयार करून त्याची विक्री गावोगावी होत असल्याचा आरोप आहे.
अशा प्रकारांवर यापूर्वी प्रभावी कारवाई न झाल्याने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
वनसंपत्तीवर डोळा ठेवणाऱ्यांना इशारा यापूर्वी दगडथर बीड क्रमांक 451 मध्ये नैवेद्य सर्वात तोंड प्रकरणात बळीराम रणबावळे यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. महागाव परिसरात संपूर्ण जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात सागवान उपलब्ध असल्यामुळे
सागवानासारख्या मौल्यवान वनसंपत्तीची अवैध तोड, चिराण, साठवणूक अथवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश टेंभुरदरा येथील कारवाईतून मिळाला आहे. सेनंद बीटसह वनपरिक्षेत्रातील संवेदनशील भागांमध्ये गस्त व तपासणी अधिक कडक करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
वनसंपत्ती ही सार्वजनिक संपत्ती असून तिचे अवैध शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच सागवान तस्करीला आळा बसू शकतो. टेंभुरदरा प्रकरणातील पुढील तपासात अवैध लाकूड कुठून आणण्यात आले, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि लाकडाचा वापर किंवा विक्री कुठे केली जात होती, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.



