महागाव शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; फवारणीची नागरिकांची मागणी
नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : शहरातील विविध भागांत सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले असून, विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील नाले, साचलेले पाणी तसेच अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी व फॉगिंग करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच शहरातील नाले व साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची स्वच्छता करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात अविनाश नरवाडे, स्वप्नील नरवाडे आणि विवेक नरवाडे यांनी महागाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



