Uncategorized

हदगाव-हिमायतनगर किनवटला जोडण्यास तीव्र विरोध; जनतेच्या इच्छेविरुद्ध निर्णय नाही, महसूलमंत्र्यांचे आश्वासन


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम ): महसूल विभागाच्या पुनर्गठनांतर्गत हदगाव आणि हिमायतनगर तालुके किनवट येथील प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याच्या हालचालींना स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे. हा प्रश्न आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी विधानसभेत आक्रमकपणे लावून धरला. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी, लोकभावनेचा आदर केला जाईल आणि जनतेवर कोणताही निर्णय लादला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
​शासनाने किनवट, माहूर, हदगाव आणि हिमायतनगर या चार तालुक्यांचा समावेश करून किनवट येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा मसुदा तयार केला होता. मात्र, हदगाव व हिमायतनगरवरून किनवटचे अंतर तब्बल १५० किलोमीटर असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. हे दोन्ही तालुके नांदेड अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयालाच जोडलेले राहावेत, अशी आग्रही मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
​या प्रस्तावावर हरकती नोंदवण्याची मुदत ७ जुलै रोजी संपली असून, आगामी १२ जुलै रोजी विभागीय आयुक्त यावर आपला अंतिम अहवाल शासनाकडे सादर करणार आहेत. त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button