Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; आमदार-माजी आमदारांचे भत्ते बंद करण्याची मागणी


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



उमरखेडच्या बंदीभागातील पिकांचे नुकसान, रस्ते-पाणी व शासकीय कार्यालयांतील अनियमिततेविरोधात एसडीओंना निवेदन; लखन जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

उमरखेड :-यवतमाळ जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच आजी-माजी आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते बंद करून तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही हिस्सा शेतकरी मदतीसाठी वळवावा, अशी मागणी करणारे निवेदन लखन जाधव, मीडिया रिपोर्टर यवतमाळ यांनी उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांच्याकडे सादर केले.

पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्या

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच पीक विमा योजनेतील नुकसानभरपाईच्या प्रक्रियेशी संबंधित पूर्वीच्या निकषांबाबत फेरविचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

“सोन्याला भाव, पण शेतमालाला नाही!”

सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असताना शेतकऱ्यांच्या कापूस व अन्य शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतमालाला योग्य दर आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बंदीभागातील रस्ते-पाण्याच्या समस्या कायम

उमरखेड तालुक्यातील बंदीभागातील मूर्ती, जेवली, मोरचेंडी, पिंपळगाव, गाडीबोरी, खेरडी, दराटी, बंदी टाकळी, चिंचोली, जवराळा, चिखली यासह विविध गावांमध्ये रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांच्या समस्या गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप

बंदीभागातील शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. संबंधित विभागांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“विकास झाला नाही तर रस्त्यावर उतरू”

बंदीभागाचा विकास अनेक वर्षांपासून रखडल्याचा आरोप करत, रस्ते, पाणी आणि शासकीय सेवांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा लखन जाधव यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे पीक नुकसान, पीक विमा, शेतमालाचा भाव तसेच बंदीभागातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button