Uncategorized

वादळी वाऱ्यासह पावसामुळे हिमायतनगर तालुक्यात मोठे नुकसान; बोरगडी-धानोरा शिवारात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
तालुक्यात काल रविवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळाचा सर्वाधिक फटका बोरगडी आणि धानोरा शिवाराला बसला असून, येथे मोठे नुकसान झाले आहे.
​वादळ इतके तीव्र होते की, अनेक शेतातील व रस्त्या कडेची मोठी झाडे पाडण्यासोबतच विजेचे खांब (DP) आणि तारा तुटून पडल्या. यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. काही ठिकाणी झाडे अंगावर पडल्याने जनावरे जखमी झाल्याची माहिती असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
​धानोरा मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button