Uncategorized

उमरखेड तालुक्यात अतीवृष्टीमुळे पूरस्थिती : आमदार किसनरावजी वानखेडे यांची तत्पर पाहणी.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतीवृष्टीमुळे उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. विडूळ गावात पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उमरखेड–महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किसनरावजी वानखेडे साहेब यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी श्री सखाराम जी मुळे साहेब,तहसीलदार सुरडकर साहेब,एपीआय विनायक रामोड यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली.पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

या वेळी आमदार किसनरावजी वानखेडे साहेब यांनी प्रशासनाला पूरग्रस्त नागरिकांसाठी तातडीने राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
व सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना केल्या.यासोबतच या संकटकाळात सर्व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button