सामाजिक

संघर्ष योद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवसा निमित्ताने बहुजनांनी केले रक्त दान समाज उपयोगी कार्यक्रम करून वाढदिवस केला साजरा – सरोजताई देशमुख

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मागील कित्येक वर्षांपासून स्वतः च्या घरावर तुळशीपत्र ठेऊन वेळोवेळी आमरण उपोषण करणारे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरखेड जि.यवतमाळ येथील मराठा रणरागिणी तथा सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या शिवमती सरोजताई देशमुख यांनी मनोजदादा च्या वाढदिवसा निमित्त महारक्तदान शिबिर , रुग्णांना फळ वाटप , उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे वृक्ष लागवड व उमरखेड – महागाव , हदगाव – हिमायतनगर व परीसरातील मागील काळात ज्या ज्या आमरण उपोषण कर्ताने आमरण उपोषण केले होते त्यांना मा.मनोजदादा जरागें पाटील यांची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले , मराठा आंदोलक , मराठा सेवक, मनोजदादा कट्टर समर्थक या सर्वांना सन्मानित करण्यात आले या सह विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती ,
या वेळी जवळपास च्या परीसरातील आमरण उपोषण कर्ते , मराठा सेवक , मराठा आंदोलक , प्रतिष्ठित नागरीक व विविध समाजातील बांधव फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या महारक्तदान शिबिरामध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन ब्लड बँकेने आपले स्टाँल लावले होते त्या मध्ये जिजाई ब्लड बँक नांदेड व अर्पण ब्लड बँक सेंटर नांदेड .
हा भव्य दिव्य कार्यक्रम नांदेड रोडवरील देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव व देशमुख संस्थेच्या सर्व शिक्षकांनी फार मोठे योगदान दिले आहे. तसेच उमरखेड येथील मनोज दादा जरांगे पाटील समर्थक यांनी पण योगदान दिले. तसेच आकाश माने यांनी खिचडी चे वाटप केले.

                 चौकट

समाजातील नव तरूणांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये व आपल्या परीवाराला व स्वतः ला अडचणीत आणू नये तसेच छत्रपती शिवाजी महाराज नंतर अठरापगड धर्मातील बांधवाना एकत्रित कोणी केले असेल तर संर्घषयोद्धा मनोजदादा जरागें पाटलांनी केलयं आणि येणाऱ्या काळात मनोजदादा जरागें पाटलांच्या पाठिमागे उभे राहण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे – सरोजताई देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!