Uncategorized

वाळू चोरीविरोधात धडक कारवाई कराश्वेता सिंघल यांचा निर्देशविभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्याशी चर्चा करताना विकास मीणा

मुख्य संपादक

यवतमाळ, ३ मे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीच्या घटना पुढे येत आहेत. अशाप्रकारे वाळू चोरी होत असल्याचे आढळल्यास धडक कारवाई करा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. केलेल्या कार्यवाहीचा पुढील महिन्यात स्वतंत्र आढावा घेण्यात येईल, असे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांनी महसूल, जिल्हा परिषद, जलसंधारण, पाणीटंचाई इत्यादी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीणा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड आदी उपस्थित होते.

वाळू चोरी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्हाभर वाळू चोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई कराः सध्या शंभर दिवस कार्यालयीन सुधारणांची मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत कार्यालयातील दस्तऐवजांचे चार गठ्ठा पद्धतीने वर्गीकरण करा.

आपले कार्यालय या मोहिमेत अधिक चांगले कसे होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिक न्याय मिळेल या अपेक्षेने यंत्रणेकडे तक्रारी करतात. अधिकाऱ्यांनी अशा तक्रारींचा निपटारा वेळेत होण्यासाठी आठवड्यात काही वेळ राखीव ठेवावा, असेही त्यांनी सूचविले.
‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ अंतर्गत गाळ काढण्याचे काम करताना जास्तीत जास्त लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून कामे करा. ही अतिशय चांगली योजना आहे. याकडे आपण योजना म्हणून न पाहता सामाजिक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिक प्रयत्न करून काम करा, अशीही सूचना विभागीय आयुक्तांनी केली.

             चौकट 

पाणीटंचाईचा आढावा
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. आराखड्याची माहिती मंदार पत्की यांनी दिली. कुठेही पाणीटंचाईची स्थिती जाणवणार नाही, याकडे लक्ष द्या. गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाईवर विशेष लक्ष द्यावे. दूषित पाण्याचे स्रोत तत्काळ बंद करावे, असे सांगितले.
शासन आपल्या मोबाईलवर’चे कौतुक
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शासन आपल्या मोबाईलवर या उपक्रमाचे आयुक्तांनी कौतुक केले. हा चांगला उपक्रम आहे. लोकोपयोगी योजनांचा व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्याच्या सूचना त्यांनी केली. इतर विभागाच्या योजनादेखील याद्वारे देण्याचा निर्देश त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!