Uncategorized

लिंकिंगविरोधात महाराष्ट्रात खत खरेदी बंद१०० टक्के प्रतिसाद

प्रतिनिधी

खरांगणा, ३ मे डीएपी, युरिया, १०:२६:२६ सारख्या खतांसोबत अन्य खतांची खरेदी करणे कंपन्यांनी बंधनकारक (लिंकिंग) केल्याने महाराष्ट्र फर्टिलायजर पेस्टीसाईड सिड्स डीलर असोसिएशनने खत खरेदी बंदचे आवाहन केले होते. त्याला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने तीन दिवसांपासून खत खरेदी बंद आहे.खत उत्पादन कंपन्यांनी ठोक व किरकोळ बी-बियाणे व खत विक्रेत्यांना १०:२६:२६. डीएपी, युरिया आदी खतांसोबत अन्य खते घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांवर अन्य खत लिंकिंग करण्याचा आग्रह करतात. परिणामी खत विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होते. मोठ्या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. लिंकिंग न केल्यास ठोक विक्रेत्यांना खते न देण्यापासून ते गावापर्यंत खत पोहोचवण्याचे भाडे आकारल्या जाते. काही कंपन्यांचे खत विक्री किमतीपेक्षा जास्त किमतीत घ्यावे लागत आहे.यात सर्वांत शेवटी शेतकऱ्यांचेच नुकसान होणार असल्याने जोपर्यंत लिंकिंग थांबवत नाही, तोपर्यंत खत उत्पादकांकडून खतांची खरेदी करण्यात येऊ नये किंवा शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत खत खरेदी बंदचा निर्णय घेण्याचे आवाहन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांनी केले होते. या संदर्भात खत उत्पादक कंपनीच्या वरिष्ठ पातळी सुद्धा याची कल्पना देण्यात आली असून, कुठलीही रॅक किंवा अन्य मागनि खत घेऊन येऊ नये, असे आवाहन केले आहे.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक होणार आहे. याशिवाय देश पातळीवर खतांचे मार्जिन वाढवणे, लिंकिंग याबाबत संघटनेचे अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी रासायनिक खत मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन दिले. लवकरच केंद्र सरकारसोबत यावर बैठक होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. स्थानिक स्तरावर काही अडचणी आल्यास जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव यांच्याशी संपर्क साधावा संघटनेच्या विरुद्ध कोणी काम करीत असेल, तर त्याची गय होणार नाही, संघटना सर्वसामान्य विक्रेत्यांसाठी उभी आहे, यामुळे शंभर टक्के खरेदी बंद असावी, असा आग्रह माफदा व वर्धा जिल्हा कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष रवी शेंडे व सचिव मनोज भुतडा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!