Uncategorized

सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न !शिवसेना तालुका महागाव द्वारा आयोजित ; पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरण

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

महागांव : येथे दिनांक २३ जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे अवचित्य साधून भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा शिवसेना महागांव तालुका यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये अ गटामधून प्रथम क्रमांक अश्विनी दशरथ ठाकरे तर दुसरा क्रमांक पायल शंकर गादेकर व वेदांत गजानन भांगे यांना समान गुण असल्यामुळे विभागून देण्यात आले व तिसरे क्रमांक प्राची प्रकाश अडकिने हिने मिळविले.
ब गटामध्ये प्रथम बक्षीस किरण मनोज जाधव या विद्यार्थिनीने पटकावले तर दुसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरण्याकरिता चार विद्यार्थ्यांना समान गुण पडले होते त्यामध्ये १) केतन विकास आडे, २) प्रज्वल प्रकाश पाटोळे ३)रितेश गजानन भांगे व ४)साहिल रवी राठोड यांचा समावेश आहे. या चारही विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर
तृतीय क्रमांक छकुली रवी चव्हाण हीस देण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री
संजय राठोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, शिवसेना उपजिल्हा प्रमूख तथा माजी जि प सदस्य बी एन चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख राजू राठोड, माजी पं.स. उपसभापती रामचंद्र तंबाखे, युवा सेनेचे लखन राठोड, प्रमोद गायकवाड, इंदल राठोड विभाग प्रमुख तथा उपसरपंच युवा सेना विधानसभा अध्यक्ष देवानंद राठोड, उपतालुका प्रमुख पवन राठोड, विभाग प्रमुख मोबीन चव्हाण, कैलास जाधव, अविनाश जाधव व पालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!