मराठी भाषेचा अभ्यास संपूर्ण जग करीत आहे -प्रा . अनिल काळबांडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :मराठी भाषा ही अमृतापेक्षाही मन जिंकणारी भाषा असून प्राचीन काळापासून ति बोलीभाषा म्हणून वापरात आहे . त्यामुळे जगातील प्रत्येक देशात मराठी भाषेवर अभ्यास होत असल्याचे प्रतिपादन मिलींद महाविद्यालय मुळावा चे मराठी विभाग प्रमुख प्रा . अनिल काळबांडे यांनी केले .
मराठी भाषेच्या पंधरवाड्या निमित्त स्थानीक दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजीत कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधिश हेमंत भुरे हे होते तर मंचावर यावेळी प्रा . जिवतोडे, वकिल संघाचे अध्यक्ष अँड. संजय डोळस , अँड. विजय गुजरे, अँड. प्रतिक जैन उपस्थित होते .
जगामध्ये मराठी भाषा ही २० व्या क्रमांकावर तर भारतात ३ ऱ्या क्रमांकावर आहे . मराठी भाषेचे वैभव हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दबल गेले आहे . ज्ञानभाषा ही लोकभाषा झाली पाहिजे म्हणून न्यायालयाचे निकाल हे मराठी भाषेतून लिखीत झाले तर वकिलाकडे येणाऱ्या क्लाइंट ला देखील समजण्यास सोपे होणार आहे . शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने यापुढे न्यायालयीन प्रक्रियेत मराठी भाषेचा वापर झाल्यास प्रत्येक वकिलांसोबत न्याय मागण्यासाठी येणाऱ्यांना देखील त्याची माहिती मिळविणे सोपे होईल असा आशावाद यावेळी प्रा . अनिल काळबांडे यांनी व्यक्त केला . यावेळी न्यायाधिश हेमंत भुरे म्हणाले की,मराठी भाषेचा वापर केला तर शेवटच्या टोकावरील पक्षकारांना त्याचा होईल .प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते . बोलीभाषा प्रत्येक जिल्हयात वेगवेगळी आहे . मराठीच भाषा पण वेगळी आहे . प्रत्येक अंतरावर भाषा बदलत असून आपल्या मराठी भाषेचा मान वाढावा म्हणून दुसऱ्यांचा भाषेचा अपमान होवू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी न्यायाधिश हेमंत भुरे यांनी केले . यावेळी अँड. जितेन्द्र पवार, सागर फुलारी, दिनेश हनवते, शे . सलीम सौदागर , एस. जी . कलाणे , शिंगणकर उपस्थित होते .प्रास्ताविक अँड . संजय डोळस यांनी केले .
संचलन निरंजन दवणे यांनी तर आभार प्रतिक जैन यांनी मानले .