शिरसाट हे बिलखेड मंडळाचे नवनियुक्त तलाठी

रिपब्लिकन सेनेच्या मागणीची जिल्हाधिकार्यांनी घेतली दखल
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
ग्रामीण भागात प्रशासनाचा मुख्य कणा असलेला महसुल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच शेतजमिनीशी संबंधित विविध नादी करण, शेतकरी व विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेले बेलखेड मंडळाचे तत्लाठी पद हे गेल्या दीड वर्ष्यापासून रिक्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे नवीन पीक कर्जासाठी लागणारी सातबारा, आठ अ, उत्पन्नाचा दाखला, फेरफार नक्कल, नॉन क्रिमिनल दाखला अशा अनेक कागदपत्रा अभावी जनसामान्यांना प्रभारी असलेल्या तलाठ्याकडे फेऱ्या माराव्या लागत असुन, उमरखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात तड़ाका शेतीला व शेतपिकांना झाला होता त्यामध्येही कमी क्षेत्राच्या नोंदी घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे आणि त्यातच इतर मंडळाचे तलाठी यांना बेळखेड मंडळाचा प्रभार दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तलाठी यांना मर्यादा येत होत्या.
त्यातच चिंचोली (संगम) हे गाव पूरपरिस्थिती जण्य अतिसंवेदनशील गावांच्या यादीमध्ये समाविष्ट असून बेलखेड मंडळामध्ये अनेक गावाचा समावेश होत असल्याने जनतेचे होणारे हाल टाळण्यासाठी तात्काळ स्वतंत्र व कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात बिटरगाव खु, चिंचोली संगम, आमला, करोडी, रांगोळी व काळेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. मागणीला बराच कालावधी उलटून सुद्धा तलाठी देण्यात येत नसल्याकारणाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आज रोजी सदर पाठपुराव्याची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत तात्काळ अनिकेत शिरसाट यांची सहा वर्षाकरिता बेलखेड मंडळास नेमणूक करण्यात आली.
सदर विषयीचा पाठपुरावा हा जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, भीमराव खंदारे, नंदू इटकरे, साहेबराव कदम, चिंचोली (संगम) गावचे उपसरपंच बंडोपंत चिंचोलकर व बेलखेड मंडळातील ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला होता.
फोटो खालील नाव :- रिपब्लिकन सेना व बेलखेड मंडळातील ग्रामस्थ नवनियुक्त तलाठी यांचे स्वागत करताना