नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गास योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया त्वरित करा. [उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना निवेदन ]

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गास योग्य मोबदला देऊन भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे. या भूसंपादन प्रक्रियेला महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असून भूमी अभिलेख विभागामार्फत संपादित होणाऱ्या महागाव तालुक्यातील सर्व जमिनीची मोजणी पुढील महिन्याभरात पूर्ण करण्यात यावी याकरिता सर्व शेतकरी भूमी अभिलेख विभागाला वाटेल ती मदत करण्यास तयार आहेत. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरवितांना शेतकऱ्यांना शासन स्तरावरून चर्चा करून बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन काढून शासनाच्या प्रचलित नियमानुसार देण्यात यावा यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय येथे येऊन निवेदन दिलेले आहे. या ठिकाणी बाबूशिंग आडे, रोहिदास राठोड, गणेश राठोड,विनायक आडे, उदयसिंग जाधव,भास्कर वाठोरे, गोपाल खोकले, रामचंद्र जाधव, दिलीप जाधव, भाऊराव जाधव, अंकुश जाधव,विश्वंभर राठोड, विठ्ठल जाधव,गंभीर आडे,अर्जुन आडे, प्रल्हाद राठोड, विक्रम राठोड, फुलसिंग पवार, व अनेक शेतकरी हजर होते.