Uncategorized

शेतकरी विरोधी सरकारला उलथुन टाका – उद्धव ठाकरे

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

शेतमालाचे पडलेले भाव शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखविलेले आमिष न मिळालेला पिक विमा अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी देण्यात आलेली आर्थिक मदत या सर्व गोष्टीवरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार किती शेतकरी विरोधी आहे.

हे आता स्पष्ट झाले असून होणाऱ्या निवडणुकीत या सरकारला उलथून टाका असे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उमरखेड येथील जनसंवाद मेळाव्यात बोलताना केले. याप्रसंगी खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संजय देशमुख माजी आमदार अनिल देसाई जयप्रकाश मुंदडा


माजी खासदार सुभाष वानखेडे जयप्रकाश दांडेगावकर शिवसेना संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे मोहनराव मोरे शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड आघाडीतील आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते या जनसंवाद मेळाव्याला उपस्थित होते यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या मेळाव्याला मार्गदर्शन करीत राज्य व केंद्र शासनावर टीकास्य डागत उमरखेड विधानसभा
मतदारसंघातील स्थानिक मुद्धधावर देखील यावेळी त्यांनी हात घालत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उमरखेड शहरात बंदिस्त ठेवणारे हिंदुत्ववादी कसे असा प्रखर सवाल दानवे यांनी बोलताना उपस्थित केला तर यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात लादलेले शिंदे फडणवीस सरकार हे राज्यातील जनतेची दिशाभूल करीत असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी येथील बेरोजगारांना रोजगार देऊ म्हणत बेरोजगारांना रोजगार तर दिलाच नाही.

उलट अमित शहा जय शहा व राज्यातील 40 गद्दारांना उद्योगपती बनविले असल्याची तोफ डागली या वेळी आघाडीतील नेत्यांनी देखील
जनसंवाद मेळाव्याला मार्गदर्शन केले उमरखेड विधानसभा मतदारसंघ किनवट विधानसभा मतदारसंघ हदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेना व महा आघाडीच्या वतीने मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती लावली होती.

        चौकट

हिंगोलीतील हळद प्रक्रिया उद्योग ही माझीच देण!

हिंगोली होत असलेला हळद प्रक्रिया उद्योग हा मी मुख्यमंत्री असतानाच मंजूर केला असून याचे श्रेय गद्दार खासदार हे घेत असून असे श्रेय घेतल्याने कुणी मोठा होत नसतो असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीचे खासदार यांच्यावर डागत सहकारी तत्त्वावर असलेला शेजारील कारखाना सहकार चळवळ मोडीत काढणारा. मतदार संघाचा काय विकास करू शकेल असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित करीत शिंदे गटात सामील झालेल्या खासदार हे हेमंत पाटील यांचा खरपूस समाचार यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!