माझी लाडकी बहीण योजनेत एकही ताई वंचित राहणार नाही

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
गटविकास अधिकारी बळवंत साहेब यांचे सक्त कर्मचाऱ्यांना आदेश
महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना वयाच्या 21 व्या वर्षी झालेल्या ताई व 65 वर्षे वयाच्या आई या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत घर परत खेडोपाडी ग्रामीण भागात जाऊन एकही ताई आई 1500 रुपये मानधनापासून वंचित राहणार नाही यांची खबरदारी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका व डाटा ऑपरेटर यांनी घ्यावी तसेच ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज स्वीकारताना त्यांच्याकडून कोणताही मोबदला घेण्यात येऊ नये अशी सक्त आदेश हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बळवंत साहेब यांनी दिले आहे रोजगार हमी योजने अंतर्गत मागेल त्याला काम व मागेल त्याला शेततळे असे मागील त्याला गोठा असे अनेक शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी
सदरील कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहेत शेतकऱ्यांचे कोणतेही काम तात्काळ करावे असे ठामपणे सांगितले आहे शेतकऱ्याच्या हितासाठी तत्पर आहेत व शेतकऱ्यांची कोणतीही अडचण माझ्याकडे आल्यास मी खपून घेतल्या जाणार नाही असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ठामपणे सांगितले