पो. ठाणे महागांव येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन केला ५,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
दिनांक ०३/०७/२०२४ रोजी पोलीस ठाणे महागांव हद्दीतील ग्राम हिवरा संगम शेतशिवारातील शेती
अवजारे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेली होती सदर प्रकरणी फिर्यादी यांनी पोलीस ठाणे महागांव येथे दिलेल्या
तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक ४६३/२०२४ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात
आला होता व सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. दिनांक ०८/०७/२०२४ रोजी स्थानिक
गुन्हे शाखेकडील पथकाने गोपणीय माहिती व तांत्रीक बाबींचे आधारे आरोपी १) शेख मुजीब शेख हजमा वय ३८ वर्षे, २)
स्वप्नील गोविंदराव गायकवाड वय २५ वर्षे, ३) त्रऋषिकेश संतोष राजवाडे वय २२ वर्षे, सर्व रा. हिवरा संगम यांना निष्पन्न
केले व ताब्यात घेवुन चौकशी केली असता नमुद आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपींचे ताब्यातुन
गुन्हयातील चोरी गेली शेतीची अवजारे, व गुन्हयात वापरलेले एक ट्रॅक्टर तसेच एक चोरीची मोटर सायकल असा एकुण
५,००,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी १) शेख मुजीव शेख हजमा वय ३८ वर्षे, २)
स्वप्नील गोविंदराव गायकवाड वय २५ वर्षे, ३) ऋषिकेश संतोष राजवाडे वय २२ वर्षे, सर्व रा. हिवरा संगम यांना पुढील
तपासकामी पोलीस ठाणे महागांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.