Uncategorized

राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्नकिनवट येथे आमदार भीमराव केरामतथा विधानसभा अन्नपुरवठा कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते संजय नागरगोजे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन्मानित चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

मुख्य संपादक मो.9021233696 किनव

दि. 05 जून 2025 रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे किनवट-माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम व विधानसभा अन्नपुरवठा कमिटीचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. गणेश कचकलवार यांची उपस्थिती होती. तर विशेष उपस्थिती म्हणून विजय सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष, परमेश्वर पेशवे, विभागीय संघटक नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार दादाराव कयापाक, किनवटचे माजी उप नगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, अजय कदम युवासेना तालुका प्रमुख किनवट, सचिन वैद्य, युवा उद्योजक नैतिक नाईक, यांचे विचार मंचावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आणि आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते देशव्यापी YGPS चॅनेलचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा भरातून आलेल्या उपस्थित पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून आमदार भीमरावजी केराम व राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच विविध शैक्षणिक संस्था व त्या संस्थेतून अभ्यास करून विविध पदावर विराजमान झालेल्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद कांबळे, सय्यद इसा यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात जिथे-जिथे युवा ग्रामीण पत्रकार संघटना आहे तिथे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महागाव तालुक्यातील संजय नागरगोजे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन्मानित चिन्ह देऊन आमदार भीमराव केराम तथा विधानसभा अन्नपुरवठा कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!