Uncategorized

दारू,जुगार बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार;आडद येथील संतप्त महिलांची पोलीस स्टेशनला धडक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

मुळावा प्रतिनिधी-:पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आडद येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावात काही दारू विक्रेते सर्रास दारू विकत आहेत. त्यामुळे गावातील युवा ,तरुण पिढी व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत,
तसेच गावात दररोज मोठ्या प्रमाणात जुगाराचे डाव सुद्धा बसत आहेत,येथे जुगार खेळण्यासाठी बाहेर गावावरून सुद्धा नागरिक जुगार खेळण्यासाठी येत असतात,त्यामुळे अखेर या दारू आणि जुगाराला वैतागलेल्या महिलांनी पोलिस ठाणे गाठत पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना दारूबंदी,जुगार बंदी साठी निवेदन दिले. आडद येथील काही सुज्ञ व्यक्तींनी दारू विक्रेत्यांना गावात दारू विकू नका, दारूमुळे आपल्या गावातील लहान मुलांना व्यसन लागले आहे, भांडणतंटे वाढले आहे. या कारणाने एखाद्यावेळी मोठा घात सुद्धा घडू शकतो, असे सांगितले असतानासुद्धा दारु विक्रेत्यांनी दारू विकणे बंद केली नाही. अखेर गावातील महिला व पुरुषांनी चर्चासभा बोलावून आडद गाव दारूमुक्त करण्यासाठी पोफाळी पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार यांना दारू,जुगार,बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे,यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,
ठाणेदार पंकज दाभाडे यांनी निवेदन स्विकारुन महिलांना तुमच्या गावातील दारू,जुगार बंद करु असे आश्वासन दिले आहे,

कोट-:
गेल्या अनेक वर्षांपासून गावात खुलेआम दारू विक्री जुगार डाव खेळला जात आहे यामुळे आमच्या संसाराची राखरांगोळी होत आहे, त्यामुळे येत्या आठ दिवसात आडद येथील दारू ,जुगार बंद झाले नाही तर जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात येईल,

आडद येथील महिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!