Uncategorized

पत्रकाराला शिवीगाळ, करुन धमकी दिल्याप्रकरणी मुरूम पोलीस ठाण्याला पत्रकार संघाच्या वतीने निवेदन…

इम्रान सय्यद
मुरुम शहर प्रतिनिधी

मुरूम ता.३०, येथील परिसरातील आलूर येथील पत्रकार हणमंत शंके यांना आलूर येथील समाज माध्यम व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अश्लील शिवीगाळ केले प्रकरणी मुरूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावे , या संदर्भात मुरूम शहर पत्रकार संघाच्या वतीने दि.३० वार गुरुवार रोजी मुरूम पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांना निवेदन देऊन संबधित व्यक्ती कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आलुर येथील पत्रकार हणमंत शंके यांना त्यांच्या गावातीलच व्हाट्सअप ग्रुपवर ऑडिओ मेसेज रेकॉर्डिंग द्वारे अश्लील शिवीगाळ केली असल्याची तक्रार आपल्याकडे दाखल करण्यात आली आहे, तरि सदरील रेकॉर्डिंग शिवीगाळ ही निंदनीय असून पत्रकारा बरोबर कुटुंबातील महिला व्यक्तींनाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे जे की आम्ही निवेदनावर व्यक्त होऊ शकत नाही, ही बाब निंदनीय आहे, एकंदरीत यांनी वापरलेले शब्द म्हणजेच धमकीचाच प्रकार असल्याचे दिसून येते, तरी अश्लील शिवीगाळ देऊन धमकी देणाऱ्यां व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे, यावेळी मुरूम शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नहीरपशा मासुलदार,सचिव मोहन जाधव,कोषाध्यक्ष प्रा.सुधीर पंचगल्ले,प्रा.महेश मोटे,विलास वाडीकर,रफिक पटेल,राजेंद्र कारभारी,रवी अंबुसे,हुसेन नूरसे,इम्रान सय्यद आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!