Uncategorized

सकारात्मकतेने कर्तव्य करण्याची गरज उमरखेड पोलीस ठाण्यात निरोप समारंभ

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांची अमरावती ग्रामीण येथे बदली झाल्याबद्दल त्यांचा पोलीस स्टेशन उमरखेड येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
पोलिसांनी आपलेपणा जोपासत सकारात्मकतेने जर कर्तव्य पार पाडली तर निश्चितच कर्तव्यात कुठलीही अडचण निर्माण होत नाही. भले तुम्ही कुठल्याही परिसरात कर्तव्य बजावत असो असे उपस्थित पोलीस अधिकारी यांना संबोधित केले व अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना निश्चितच त्यांच्या चांगल्या कामाची आठवण येते असेही यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना ठाणेदार शंकर पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळातील त्यांच्या अनेक बेधडक कारवाईच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला. तसेच पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समर्पित भावनेने पार पाडलेल्या कर्तव्याबद्दल उमरखेड वाशीयांच्या वतीने आभार सुद्धा व्यक्त केले. बदलीच्या ठिकाणी सुद्धा ते आपल्या कामाची वेगळी छाप उमटविल्या शिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स.पो. निरीक्षक निलेश सरदार, स. पो. निरीक्षक सारिका राऊत, पो. उपनिरीक्षक सागर इंगळे पो. उपनिरीक्षक भास्कर दरणे, पो. उपनिरीक्षक अनिल सावळे, परी. पो. उपनिरीक्षक अमर खिल्लारे पो. उपनिरीक्षक सुदर्शन वानोळे, पो. ना. नरेंद्र पुंड रिपब्लिकन सेनेचे ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. कार्याध्यक्ष साहेबराव कदम तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!