उमरखेड शहरातील रस्ते होणार चकाचक

४० कोटीचा निधी ; नितीन भुतडा यांच्या प्रयत्नांना यश
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड, दि.१० (तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उमरखेड नगरपरिषदे अंतर्गत नागरी दळणवळण रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत तब्बल ४० कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला असून नितीन पुतळा भाजपा जिल्हा समन्वयक यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे यामुळे येणाऱ्या काळात शहरातील रस्ते चकाचक होऊन नागरिकांना सुविधा
मिळणार आहे
शहरातील मुख्य रस्ते अनेक वर्षीपासून अरुंद व खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्यावर नागरिकांना दळणवळण करताना
अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मुख्य
रस्त्यासह शहरातील इतर इतर जोड रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. सदर
रस्त्यावर कायमस्वरूपी व
टिकाऊ काम होण्याकरिता
भाजपा जिल्हा समन्वयक
नितीन भुतडा यांनी विविध
रस्त्यांसंदर्भात प्रस्ताव तयार करून शासनाकडे मागणी रेटून धरली. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या वतीने ७ फेब्रुवारी २०२४ रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार ३८ कोटी ५६ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
एकही काम शिल्लक ठेवणार नाही – नितीन भुतडा
शहराचा सर्वांगीण विकास
व्हावा ही माझी सुरुवातीपासूनच भूमिका आहे. आणि त्या दृष्टीनेच माझे प्रयत्न सुरू असून भविष्यात उमरखेड शहरा त करावे यासाठी कोणतेही काम शिल्लक ठेवणार नाही त्यापूर्वीच सर्व कामे करून उमरखेड कसे नावारूपास येईल यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलताना भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सांगितले.