ढाणकी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत

अध्यक्षपदी संदीप गोपेवाड तर उपाध्यक्षपदी . सौ.भाग्यश्री वैद्य यांची निवड
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढाणकी च्या शाळा व्यवस्थापन समितीची नुतन कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी संदिप गोपेवाड तर उपाध्यक्षपदी सौ भाग्यश्री वैद्य यांची निवड करण्यात आली .
अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत संदिप गोपेवाड यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद कांबळे यांचा पराभव केला तर उपाध्यक्ष पदी सौभाग्यश्री वैद्य यांनी बाजी मारली.
विद्यार्थ्याच्या सर्वागिण विकासासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास पूर्ण करून विद्यार्थीकेंदित शिक्षण द्यावे अशी पालकांची भूमिका या सभेमध्ये स्पष्ट केली .
यावेळी समितीच्या सदस्य पदी स्वरूपा नाईकवाडे ,जगदीश शिंदे , सारिका कत्तरवाड , मनिषा पाईकराव, सुवर्णा वायकोळे, शिवाजी सुरोशे, सविता कानिंदे, विनोद कांबळे, गजानन दुपलवाड, शे. अफरोस शे उस्मान , विठ्ठल वायकोळे शिक्षक तज्ञ ,मुख्याध्यापक जवळेकर मॅडम यांची निवड झाली.
संदिप गोपेवाड यांनी आपल्या निवडीचे श्रेय जॉन्टी विनकरे, विजय वैद्य, संदिप मंतेवाड यांना दिले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अनिल गायकवाड,संदीप मंतेवाड, जॉन्टी विनकरे, विजय वैदय, अशोक मोरे, बंटी भरणे तसेच गावकरी मंडळी हजर होते.