Uncategorized

उमरखेड तालुका कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना शेतीशाळा घेऊन मार्गदर्शन

ग्रामीण प्रतिनिधी -विलास. टी. राठोड
मो. 8459804698

आज रोजी
तालुका कृषी अधिकारी कार्यालय उमरखेड श्री. गंगाधर बळवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदी भागतील जेवली , मुरली , एकंबा या गावामध्ये सोयाबीन पिकावरील पिवळे मोझॅक वर शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक श्री . सोमनाथ जाधव व कृषी सहायक आबा राव कदम यांनी केले .
यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. परंतु मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप झालेली असून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच रोपअवस्थेतच पिवळे- पांढरे पडत आहे.

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये “क्लोरोसिस” लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस हि जमिनीत लोहाची (फेरसची) कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते.
लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरां फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.

कारणे: लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!