ढाणकी येथे गणपती विसर्जन मिरवणूक मध्ये तणाव,पत्रकारच्या घरावर हल्ला

ढाणकी प्रतिनिधी :
17 सप्टेंबर रोजी रात्री मंगळवारी गणपती विसर्जन मिरवणूक चालू असतानी हनुमान परिसरामध्ये दोन समुदाय मध्ये तणाव निर्माण होऊन धार्मिक दंगल झाली.यात दंगल खोरांनी त्या परिसरातील अल्पसंख्यांक पत्रकार शेख इरफान यांच्या घरावर हल्ला करून घरातील दरवाजे, खिडक्या आणि वाहनावर दगडफेक करून नुकसान केले व जातीवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत घोषणा दिल्या याबद्दल बिटरगाव पोलीस स्टेशन ला तक्रार देत या दंगल खोर लोकावर कठोर कार्यवाही ची मागणी दैनिक भास्कर चे प्रतिनिधी शेख इरफान यांनी केली आहे.
चौकट
ढाणकी च्या गणपती विसर्जन मिरवणूक च्या वेळी दंगे होणार अशी दबक्या आवाजात चर्चा असतानी पोलीस प्रशासन इतकी निष्काळजी का? बंदोबस्त करतानी प्रत्येक गणेश मंडळा जवळ पोलीस कर्मचारी का ठेवले नाही?त्यांना या दंगली घडवायचे होते का? या दंगली घडवणारा मास्टर माईंड कोण? त्याची चौकशी पोलीस अधीक्षक करतील का? असे पिडीत नागरिक प्रश्न करत आहे.